Ganpatipule Temple Dress Code : गणपतीपुळे मंदिरात लवकरच ड्रेसकोड लागू

भक्त व पर्यटकांसाठी देवस्थान समितीकडून मंदिर परिसरात प्रबोधनपर फलक
Ganpatipule Temple Dress Code
गणपतीपुळे मंदिरात लवकरच ड्रेसकोड लागू
Published on
Updated on

गणपतीपुळे : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात देवदर्शनासाठी येणार्‍या भक्त व पर्यटकांना भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून देवदर्शन घेता यावे, याकरिता लवकरच ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर यांनी दिली आहे.

तसेच सध्या ड्रेसकोडबाबत भक्त पर्यटकांमध्ये प्रबोधन व्हावे याकरिता मंदिर परिसरात देवस्थान समितीकडून प्रबोधनपर माहिती फलक लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी सध्या भक्त व पर्यटकांना मंदिरात दर्शन घेण्याच्या दृष्टीने भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून दर्शन घेता यावे यासाठी ड्रेस कोड लागू केले आहेत.गणपतीपुळे येथील गणपती मंदिरातदेखील भक्त व पर्यटकांना भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून देवदर्शन घेता यावे याकरिता आम्हीदेखील ड्रेस कोड लागू करण्याच्या विचारात आहोत. या फलकामध्ये भक्त व पर्यटक बंधू-भगिनींना आवाहन केले आहे की, आपण गणपतीपुळे धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आला आहात. स्वयंभू गणेशाच्या आशीर्वादाने आपले कार्य सिद्धीस जाते. तरी दर्शनाला येणार्‍या सर्वांनी मंदिर परिसरात वावरताना आपला पेहराव हा आपल्या भारतीय हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत व शुचिर्भूत असावा, जेणेकरून आपल्या देवतेचे दर्शन करायला जाताना परिसरातील वातावरण, सांस्कृतिक वारसा व परिसराचे पावित्र्य टिकवणारा असेल.

तरी अंगभर वस्त्र परिधान करून देवदर्शन घ्यावे, जेणेकरून आपल्या सोबत असणार्‍या असंख्य भाविकांना संकोचल्यासारखे वाटणार नाही व त्यांच्या चित्तवृत्ती विचलित होणार नाहीत. नियम, कायदे यापेक्षा स्वयंप्रेरणेने केलेले वर्तन हे नेहमी समाजासाठी उपकारक असते अशाप्रकारचे प्रबोधनपर माहिती फलक सध्या देवस्थान समितीकडून मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील इतर प्रमुख देवस्थानप्रमाणे गणपतीपुळे मंदिरातही भक्त व पर्यटकांसाठी ड्रेस कोड लागू व्हावा याकरिता गणपतीपुळे पंच कमिटीची एक विशेष बैठक लावण्यात येईल व त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय व ठराव मंजूर केल्यानंतरच ड्रेस कोडची अंमलबजावणी सुरू केली जाईल, अशी माहिती देवस्थानचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर यांनी दिली तत्पूर्वी मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या प्रबोधन पर माहिती फलकाच्या सूचना लक्षात घेऊन गणपती मंदिरात येणार्‍या प्रत्येक भक्त व पर्यटकांनी आपल्या हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून देवदर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news