सध्या एनडीआरएफ व स्थानिक पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.  (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Ganesh Visarjan Tragedy | गणेश विसर्जनाच्या वेळी तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

खेड तालुक्यातील अलसुरे येथील दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

Youth Drowned In Water

खेड : गणेशोत्सवाच्या उत्साहात संपूर्ण कोकण रंगून गेले असताना खेड तालुक्यातील अलसुरे येथे मात्र एका कुटुंबावर दुर्दैवाचा डोंगर कोसळला. भोस्ते पाटीलवाडीतील मंगेश पाटील (वय २८) हा तरुण गणपती विसर्जनाच्या वेळी जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना गुरुवारी दि. २८ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, मंगेश पाटील आणि त्याच्यासोबत आणखी एक तरुण नदीपात्रात उतरले होते. मात्र त्या वेळी पाण्याचा प्रवाह अतिशय तीव्र होता. दोघेही पाण्याच्या जोरात बुडू लागले. कसाबसा प्रयत्न करून दुसरा तरुण किनाऱ्यावर पोहोचला, परंतु मंगेश याला मात्र प्रवाहाने वाहून नेले.

घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशामक दल, ‘विसर्जन कट्टा पथक’, खेड रेस्क्यू टीम तसेच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा, तहसीलदार व प्रांताधिकारी हेही मदतकार्यासाठी उपस्थित होते.

दरम्यान, मंगेश पाटील यांच्या घरात यंदाच पहिल्यांदाच गणरायाचे आगमन झाले होते. तोही गणपती नवसाचा असल्याची चर्चा गावभर सुरू आहे. एकीकडे बाप्पाच्या आगमनाचा आनंद घराघरात साजरा होत असताना दुसरीकडे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने भोस्ते पाटीलवाडी तसेच परिसर हळहळून गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT