Children Death File Photo
रत्नागिरी

Children Death| राजापूर तालुक्यातील नाणार खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू

Children Death| 3 मृतदेह हाती, मुलीचा शोध सुरू, राजापुरात मन हेलावून टाकणारी दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

नाटे : पुढारी वृत्तसेवा

सागरी पोलीस ठाणे नाटे अंतर्गत येणाऱ्या नाणार इंगळवाडी येथे रविवारी दुपारी काळीज पिळवून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. खाडीत मुळे (कालवे) काढण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच मुले खाडीच्या खोल पात्रात बुдали. यातील एका मुलीला वाचवण्यात यश आले असले, तरी एका मुलासह तीन मुली अशा चार निष्पाप भावंडांचा बुडून मृत्यू झाला. पैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मोहम्मद भाटकर (६), जुहेरिया भाटकर (९) आणि बुशिरा भाटकर (११) अशी त्यांची नावे आहेत. तर माहिर भाटकर (वय १५) हिचा शोध अद्याप सुरू आहे.

नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळवाडी येथील जुनेद भाटकर हे पत्नी हीना व आपल्या मुलांसह विचार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजण्याच्या सुमारास खाडीमध्ये मुळे व कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात कालवे काढत होते. दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या पात्रातील एका खोल खड्ड्याचा अंदाज मुलांना आला नाही.

त्यामुळे एकापाठोपाठ एक अशी पाचही लहान मुले खाडीच्या खोल पाण्यात ओढली गेली. मुलांचा आरडाओरडा सुरू झाल्यावर त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये एका लहान मुलीला वाचवण्यात यश आले; मात्र इतर चार भावंडे पाण्याच्या खोल प्रवाहात बुडाली. घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थल दाखल झाले.

ग्रामस्थ आणि मच्छिमारांच्या साहाय्याने तातडीने बचाव व शोधकार्य सुरू केले. त्यातून मोहम्मद, जुहेरिया आणि बुशिरा या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत, तर माहिरचा शोध अद्याप खाडीपात्रात युद्धपातळीवर सुरू आहे.
एकच घरातल्या चार निष्पाप मुलांवर काळाने घाला घातल्याने इंगळवाडीसह संपूर्ण नाणार आणि राजापूर परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, भाटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थलり पोलीस बंदोबस्त तैनात असून, परिसरात शांतता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT