Ratnagiri DCC Bank (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Ratnagiri DCC Bank Issue | जिल्हा मध्यवर्ती बँक अपहारातील 2 तोळे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश

Police Recover Gold | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून अपहार झालेल्या 50 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 2 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून अपहार झालेल्या 50 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 2 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. हे सोन्याचे दागिने संशयित आरोपी बँकेचा शिपाई अमोल आत्माराम मोहिते (42,रा.टिके,रत्नागिरी) याच्या घरातून मिळाले आहेत.

बँकेचा शिपाई अमोल मोहिते शाखाधिकारी किरण विठ्ठल बारये आणि कॅशियर ओंकार अरविंद कोळवणकर या तिघांनी संगनमताने 18 फेब्रुवारी 2025 ते 4 ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण ठेवण्यात आलेल्या नागरिकांचे दागिने बँकेच्या तिजोरित ठेवताना त्यातील काही दागिने परस्पर लांबवत होते. अशा प्रकारे त्यांनी 6 महिन्यात एकूण 504.34 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले.

दरम्यान, काही दिवसांनी या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यावर गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करताना शहर पोलिसांनी अमोल मोहितेला अटक केली. पोलिस कोठडीत त्याची कसून चौकशी केल्यावर त्याच्या घरातून 2 तोळे सोने हस्तगत करण्यात पोेलिसांना यश आले आहे.

नागरिकांनी निश्चिंत रहावे

जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अपहार झालेल्या 50 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा सर्व मुद्देमाल लवकरात-लवकर हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळेल त्यामुळे नारिकांनी निश्चिंत रहावे असे आश्वासन शहर पोलिसांकडून देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT