पावस : येथील रत्नागिरी ते राजापूर या सागरी मार्गावरील गौतमी नदीवरच्या पुलाच्या बांधकामाला आठ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
भाट्ये ते पूर्णगड या दरम्यान दळणवळणाच्या दृष्टीने पन्नास वर्षांपूर्वी गौतमी नदीवरती पूल बांधण्यात आला त्यामुळे या मार्गावरती एसटीची व खाजगी वाहतूक सुरू होती त्यावेळी पूर्णगड व रत्नागिरी या ठिकाणी खाडीतून नव्हता त्यामुळे या परिसरात येण्यासाठी लांजावरून रस्ता वाहतूक स्कूलला होत होती.
अखेर या मार्गावर 1985 मध्ये भाट्ये खाडी व 1998 मध्ये पूर्णगड गावखडी खाडीवर पूल झाल्यानंतर रत्नागिरी ते राजापूर अशी वाहतूक सुरू झाली त्यानंतर हा मार्ग सागरी मार्ग घोषित केल्यानंतर या मार्गावरती काही ठिकाणी रुंदीकरण तर काही ठिकाणी पूल बांधण्यात आले आता हा रस्ता चौपदरी होणार असल्याने या मार्गावरती अनेक ठिकाणी चौपदरीकरणाची कामे सुरू आहे या पार्श्वभूमीवर पावस येथील गौतमी नदी वरती नवीन पुलाकरिता आठ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला त्याचे महिन्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते कामाची भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या नवीन पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे या परिसरात चौपदरीकरणाच्या कामाला पुढील वर्षांमध्ये वेग येण्याची शक्यता आहे.