रत्नागिरीतील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा; पंपावर रांगा, पर्यटक हैराण

आता तुम्हीच सांगा आम्ही कसं जगायचं, रिक्षाचालकांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्‍या सीएनजीच्या वाहनांना बसत आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकही हैराण झाले आहेत. ‘आम्ही फिरायचं कधी आणि गॅस कधी भरायचा’, असा सवाल पर्यटकांनी तर ‘साहेब तुम्हीच सांगा आता आम्ही कसं जगायच.... असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात सर्वच पंपांवर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यातील परिस्थिथी गंभीर बनली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत आहे. उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांनासुद्धा या सीएनजीचा सामना करावा लागत आहे. ज्या पर्यटकांच्या गाड्या सीएनजीवर चालणार्‍या आहेत. त्यांना तासनतास गॅस भरण्यासाठी रांगामध्ये उभे रहवे लागत आहे. यातच त्यांचा वेळ जात आहे. साधारण जिल्ह्यात सर्वच पंपावर किमान २ ते ३ कि.मी. पर्यंत लांबचलांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. यामुळे ४ ते ५ तास गॅस मिळवायला वेळ लागत आहे. काही वेळा नंबर येतो मात्र गॅसच संपतो, अशाही प्रसंगाला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे सध्या सर्वच वाहनचालक हैराण झाले आहेत.

वाढत्या पेट्रोलला पर्याय म्हणून अनेकजण सीएनजी पर्याय देत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सीएनजी वाहनांची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण असे असले तरीही जिल्ह्यात अजूनही मुबलक सीएनजी पंप उपलब्ध होऊ न शकल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात रत्नागिरी व चिपळूण या मोठ्या शहरात दोनच पंप आहेत. तर शहरालगत १ पंप आहे. खेडमध्ये २, संगमेश्वरमध्ये ३, लांजात १, राजापूरला १ असे पंप आहेत.

सकाळी ५ वाजल्यापासून आपण सीएनजीच्या पंपावर रांगेत आहे. सकाळी ११ वाजलेतरी नंबर आलेला नाही. पंपावरील कर्मचारीसुद्धा नीट उत्तरे देत नाहीत. दिवस सीएनजी भरण्यातच जात असल्याने आम्ही धंदा कसा करायचा ? आता तुम्हीच सांगा आम्ही कसं जगायचं.
नंदकिशोर देऊलकर, रत्नागिरी (रिक्षाचालक)
मुलांना सुट्टी लागल्याने आपण कोकण फिरण्यासाठी रत्नागिरीत आलो आहेत. परंतू येथे सीएनजीचा मोठा तुटवडा असल्याने जिल्ह्यात सर्वत्रच पंपावर लांबच्या लांब रांगा आहेत. यामध्येच आमचा वेळ जात आहे.
नंदकिशोर देऊलकर, रत्नागिरी (रिक्षाचालक)
मुलांना सुट्टी लागल्याने आपण कोकण फिरण्यासाठी रत्नागिरीत आलो आहेत. परंतू येथे सीएनजीचा मोठा तुटवडा असल्याने जिल्ह्यात सर्वत्रच पंपावर लांबच्या लांब रांगा आहेत. यामध्येच आमचा वेळ जात आहे.
संजय राठोड,पर्यटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT