Crime News  pudhari
रत्नागिरी

Chiplun Skeleton Mystery| नरबळी की घातपात? 'त्या' जळक्या सांगाड्याचे गूढ उलगडणार!

Chiplun News - पोलिस तपास वेगात, बागेतील कामगारांची कसून चौकशी

पुढारी वृत्तसेवा

Chiplun Skeleton Mystery news

चिपळूण शहर : तालुक्यातील रामपूर आवटेवाडी येथे आंबा बागेत सापडलेल्या जळक्या मानवी सांगाड्याचे गृढ लवकरच उकलण्याची शक्यता असून, हा प्रकार नरबळी की घातपात याबाबत पोलिस सखोल तपास करत आहेत. लवकरच हे प्रकरण उघड होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रामपूर येथून देवखेरकीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आवटेवाडी येथील आंबा बागेत शनिवारी दुपारी जळालेल्या अवस्थेत हाडेसदृश सांगाडा आढळून आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फुलचंद मॅगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळावरून जळलेली बॅग, बनावट चार दात, दोन लोखंडी रॉड आणि दोन अंगठ्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर रत्नागिरीहून ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन तपासणी करण्यात आली. जप्त हाडे पुढील तपासासाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या आंबा बागेत काम करणारे तीन नेपाळी मजूर व एक स्थानिक कामगार यांची पोलिसांनी सखोल चौकशी केली असून, त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्राथमिक अंदाजानुसार हा सांगाडा १२ ते १३ वर्षांच्या मुलगा किंवा मुलीचा असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नरबळीचा आहे की नियोजित घातपात, याबाबत परिसरात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, राज्यात अंधश्रद्धा आणि बुवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले असून, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. संबंधित मजूर आणि व्यक्तींकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, लवकरच या गूढाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

तपासाला मिळाली दिशा

हा प्रकार दीड ते दोन महिन्यांपूर्वी घडलेला असावा. येथील कामगारांनी हा प्रकार आम्ही दोन महिन्यांपूर्वी पाहिला असल्याचे सांगितले. मात्र, भितीपोटी या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली नाही. बॅगेच्या बाहेर एका डोक्याचा भाग असल्याने हे कामगार घाबरले व त्यांनी ही माहिती कोणालाच दिली नाही. मात्र, शनिवारी याबाबत त्यांनी बागेच्या मालकांना माहिती दिली व त्यांनी चिपळूण पोलिसांना खबर दिली. त्यामुळे संबंधित कामगारांची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणी पोलिस आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असून तपासाला दिला मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT