रत्नागिरी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी चर्चा करताना सकल हिंदू समाज संघटनेचे पदाधिकारी  (Pudhari Photo)
रत्नागिरी

Ratnagiri News | रत्नागिरीत अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस सापडल्याने खळबळ

तिघांवर गुन्हा दाखल, रणजीत दमाईला अटक

पुढारी वृत्तसेवा

Apartment beef Seizure in Ratnagiri Police Crime

रत्नागिरी: शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत गोवंश सदृश्य प्राण्याचे तीन ते चार किलो मांस सापडले. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी अपार्टमेंटचा वॉचमन रणजीत दमाई, त्याची पत्नी आरती रणजीत दमाई (दोन्ही मुळ रा.नेपाळ, सध्या रा.यशोदा अपार्टमेंट, संसारे गार्डन एकता मार्ग, रत्नागिरी) आणि नासिर मुल्ला (रा. रत्नागिरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत दमाईला अटक केली आहे.

या प्रकारामुळे संतप्त सकल हिंदू समाजाने आज (दि.४) पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेतली. गेल्या १० महिन्यांत रत्नागिरीत ४ गोहत्या झाल्या असून पोलिसांकडून संशयितांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याची संतप्त भावना त्यांनी पोलिस अधीक्षकांसमोर मांडली. पोलिसांनी गोमांस वाहतुक तसेच विक्री होत असलेल्या ठिकाणीही गस्त तसेच सापळा रचून कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने यावेळी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. यावर पोलीस अधीक्षक बगाटे यांनी संशयितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सकल हिंदू समाजाच्या पदाधिकार्‍यांना दिले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंणकर, पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सीसीटीव्ही फुटेजमधून लागला तपास, दुचाकीवरून तिघेजण आल्याचे दिसले

मारुती मंदिर नजीकच्या एकता मार्ग येथे गोवंश सदृश्य प्राण्याचा पाय टाकलेला आढळून आल्याने सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. दरम्यान, याची माहिती मिळताच शहर पोलीसही तात्काळ दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका दुचाकीवरून तिघेजण येऊन त्यापैकी एक जण हातात पिशवी घेऊन निघून गेल्याचे दिसून आले.

या व्यक्तीचा शोध घेतला असता तो नजीकच्या यशोदा अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांना एका टबमध्ये गोवंशाच्या मागच्या बाजुचा पाय आणि अंदाजे तीन ते चार किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून मांस जप्त केले आणि वॉचमनच्या पत्नीला तात्काळ ताब्यात घेतले. तेव्हा तिने आपल्या पतीने हे मांस नासिर मुल्लाकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, गोरक्षक सुशील कदम यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत वॉचमनच्या घरात सापडलेले मांस गोमांस असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ते गोमांसच आहे कि अन्य प्राण्याचे मांस आहेत ते तपासणीसाठी खेडशी येथील लॅबला पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी आरती रणजीत दमाई, रणजीत दमाई आणि नासिर मुल्ला या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT