A cowshed collapsed in Natu village in Vanoshi, Dapoli, one cow death and injuring five animals.
दापोली : पुढारी वृत्तसेवा
दापोलीत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने दि २६ रोजी पहाटे ६ वाजता तालुक्यातील वानोशी तर्फे नातू येथील चंद्रकांत शंकर चव्हाण यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा कोसळला. या गोठ्यात एकूण सहा जनावरे होती. त्या पैकी एक गाय दगावल्याची घटना घडली आहे. तर पाच जनावरे ही जखमी झाली आहेत.
या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस पाटील सुरज चव्हाण यांनी तातडीने जेसीबी आणि त्यांचे मजूर आणि गावकऱ्यांच्या मदतीने अन्य जनावरांना वाचविले आहे. या बाबतची माहिती स्थानिक तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेत चव्हाण यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जनावरांची वैरण पावसात भिजली आहे.