कोकण

रत्नागिरी : ”रहायला घर आणि काम देतो…” त्याच्या या जाळ्यात ‘ती’ फसली

backup backup

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : फ्लॅट आणि नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवून महिलेची सुमारे साडे तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शनिवारी संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश अशोक मुरकर (रा.मागलाड फणसोप, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात 36 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 30 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाश याने तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन केला. फ्लॅट आणि काम मिळवून देतो असे सांगत त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये उकळले. परंतु पैसे देऊनही फ्लॅट आणि नोकरी यातील काहीच मिळाले नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेने प्रकाशला याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक पोलीस फौजदार अशोक राठोड याबाबत अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT