दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठेत असलेल्या मंगलमूर्ती स्पेअरपार्ट दुकानाला आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी रात्री (दि ८) उशीरा दुकानास आग लागली. खेड नगर परिषदेचे कर्मचारी आणि दापोली नगर पंचायतीचे कर्मचारी फायरब्रिगेडच्या गाड्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक ग्रामस्थांनी देखील आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र आगीने उग्र रूप धारण केल्याने या आगीत दुकान जळून खाक झाले.
हेही वाचा :