कोकण

दापोली : लाच घेताना महावितरण उपकार्यकारी अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

Shambhuraj Pachindre

दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि. ९) रोजी रंगेहात पकडले.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अमोल मनोहर विंचूरकर यांनी ठेकेदाराकडे पक्षकाराकडे बसविण्यात येणाऱ्या ११० केव्हीए विजभार व विजरोहित्र या कामाच्या एस्टीमेटला मंजुरी देवून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ५० हजारांची रक्कम ठेकेदाराकडून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंता अमोल विंचूरकर यांना आज दुपारी १.४७ वाजता रंगेहात पकडले.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT