राजापूर, पुढारी वृत्तसेवा : हातिवले येथील टोलनाका मोडतोडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन अटक केलेले मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना आज (दि.१८) राजापूरच्या दिवाणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावरुन सरकारवर टीका केली होती. त्यापार्श्वभूमीवर हातिवले (ता. राजापूर) येथील टोलनाक्याची मोडतोड मनसेकडून करण्यात आली होती. यावेळी केबीनच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि तालुका उपाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
हेही वाचा