कोकण

रत्नागिरी जिल्ह्यावर पाणीटंचाईची गडद छाया

backup backup

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : मोसमी पुर्व पावसानेही पाठ फिरवल्यामुळे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी जिल्ह्यात टंचाईची संकट गडद होत आहे. जिल्ह्यात सध्या 105 गावातील 195 वाड्यांत टँकरने पाणी पुरवठा केला जात असून 39 हजार 199 लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. आठ दिवसांमध्ये 14 गावातील 23 वाड्यांची भर पडली आहे.

उन्हाची तिव्रता चांगलीच जाणवत आहे. त्यामुळे विहिरी, नद्या, नाले कोरडे पडू लागले आहेत. अनेक विहिरी, विंधनविहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याचा स्रोतच उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पाणी पाणी करत फिरावे लागत आहे. शासनाकडून टँकरचा पर्याय दिला आहे. मात्र वाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता हे टँकर अपुरे पडत आहेत. जिल्ह्यात 195 वाड्यांना टँकरचा आधार आहे. यासाठी 4 शासकीय आणि 14 खासगी टँकर घेण्यात आले आहेत.

आतापर्यंत 1 हजार 317 फेर्‍या झाल्या आहेत. 39 हजार 199 लोकांना टँकरने पाणी दिले जात आहे. मागील आठवड्यात हा आकडा 36 हजार 344 लोकांना टँकरने पाणी दिले जात होते. मोसमी पाऊस लांबला तर जिल्ह्यात टंचाईची तिव्रता अधिक जाणवणार असून त्यासाठी प्रशासनाला सज्ज रहावे लागणार आहे. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात 4 गावातील 16 वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. या परिसरातील 11 हजार 125 लोकांना टंचाईची झळ बसत आहे. आतापर्यंत सुमारे 300 फेर्‍या पाणी पोचवण्यात आले आहे.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT