Maharashtra Weather Alert Canva
महाराष्ट्र

Maharashtra Weather Alert | मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Alert | हवामान खात्याचा अलर्ट: वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट, खबरदारी घेण्याचे आवाहन

shreya kulkarni

भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होईल असा हवामान स्थितीचा इशारा दिला आहे. यामध्ये निकोबार द्वीपसमूह, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम यांसारख्या प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे स्थानिक जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या उप-हिमालयीन भागांमध्ये देखील वादळ, विजांच्या कडकडाटासह प्रतितास ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे शेती, वाहतूक यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंदमान आणि निकोबार येथे काही भागांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात 11 ते 19 मे 2025 दरम्यान वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या कालावधीत राज्यातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता

IMD च्या अंदाजानुसार, पुढील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे:

हवामान विभागाचे इशारे

  • यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

    करण्यात आला आहे.

  • ऑरेंज अलर्ट: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT