Maharashtra Politics |
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते; त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही? File Photo
महाराष्ट्र

Maharashtra Politics | शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते; त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही?

पुढारी वृत्तसेवा

पुणे : मराठा आरक्षणाचा लढा आजच्चा नाही. १९८० च्या दशकापासून आरक्षणाची मागणी होत आहे. या काळात शरद पवार तब्बल चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या सत्ता काळात आरक्षण का दिले नाही, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली.

या प्रश्नावर नेहमीच दुटप्पी भूमिका घेणाऱ्या शरद प्यार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे का, हे स्पष्ट करावे, असे फडणवीस म्हणाले. आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न डोक्यातून काढून टाका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार, आपले सरकार स्थापन करणे हे एकब लक्ष्य समोर ठेवा, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या कार्यकत्यांना केले.

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात उद्‌द्घाटनाच्या सत्रात फडणवीस बोलत होते. म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात स्व. खासदार गिरीश बापट सभागृहात रविवारी दिवसभरासाठी हे अधिवेशन झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्दधाजर शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते नहायुती सरकारकडे बोट दाखवत आहेत. माझा त्यांना संथाल आहे, काही अपवाद वगळता राज्यात दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. मग त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का मिळवून दिले नाही, असे फडणवीस म्हणाले.

शरद पवार तर चार बेला राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांचा मराठा समाजाला आरक्षण देता आले नाहीं. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते. सर्वोच्च न्यायालयातही ते टिकविले होते मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सरकारला हे आरक्षण टिकविता आले नाही, असा ठपका फडणवीस यांनी ठेवला, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना ते म्हणाले, आपली लढाई केवळ तीन पक्षांविरोधात नरडतो, तर त्यात खोटा नरेटिव्ड देखील होता. त्यामुळे आपला पराभव झाला. त्यांच्या खोट्या प्रचाराचा आपण सामना करू शकलो नाही.

कमी मताधिक्याने आपण बारा जागा गमावल्या, आपली मरो कमी झाली नाहीत. आपल्याला दीड कोटी मते मिळाली. ती पावणेदोन कोटीपर्यंत वाढविली की आपण सत्तेवर येऊ, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सर्वांचे स्वागत केले. राजेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले. पुण्यातील पदाधिकायांनी अमित शहा आणि उपस्थितांचा सत्कार केला.

मराठा आरक्षणाचे मारक उद्धव ठाकरे :

बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मराठा समाजाला फडणवीस यांनी टिकणारे आरक्षण दिले, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते मिळाले नाही. मराठा आरक्षणाचे मारक केवळ उद्धव ठाकरे आहेत. ठाकरे सरकारने मोदी सरकारच्या १८ योजना बंद पाडल्या. ओबीसीचे परत गेलेले राजकीय आरक्षण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आणले, महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक थांबवण्याचे पाप केले.

मराठा आरक्षणाबाबत विरोधी नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी

मनोज जरगि यांना माइश सवालच नाही. उद्धव ठाकरे, सरद पवार, नाना पटोले यांना माझा प्रश्र आहे. या आंदोलनाबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे का, तुमचे समर्थन आहे का, ते स्पष्ट करा, अशी आक्रमक भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी नेत्यांना आव्यान दिले. तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. हा खोटारडेपणा समोर आणावाच लागेल, असे त्यांनी सांगितले.

अण्णासाहेबांनी स्वतःला आरक्षणासाठी संपविले

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आरक्षणाची लढाई १९८२ साली सुरू झाली होती. त्यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले, तुम्ही आरक्षण दिले नाही तर मी स्वत: ला संपवेन. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही देत. त्यानंतर अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय आण्णासाहेब पाटील होते, असे फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले

SCROLL FOR NEXT