हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर. (file photo)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का, महायुती सुसाट, मुश्रीफ, आबिटकर आघाडीवर

Maharashtra Assembly Elections : १० पैकी ७ जागांवर महायुती आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील १० पैकी ७ जागांवर महायुतीचे (Mahayuti) उमेदवार आघाडीवर आहेत.

कोल्हापूर उत्तरमध्ये चुरशीची लढत

कोल्हापूर उत्तरमधून (आठवी फेरी) राजेश लाटकर 3800 मतांनी आघाडीवर आहेत. राधानगरी मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर 12814 मतांनी (बारावी फेरी) आघाडीवर आहेत. कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ 4794 मतांनी (तेरावी फेरी) आघाडीवर आहेत. इचलकरंजीमधून भाजपचे राहुल आवाडे 25910 मतांनी (नववी फेरी) आघाडीवर आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक 14267 मतांनी (तेरावी फेरी) आघाडीवर आहेत.

शिरोळमध्ये यड्रावकर निर्णायक आघाडीच्या दिशेने

शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 26000 मतांनी (तेरावी फेरी) आघाडीवर आहेत. शाहुवाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील 3714 मतांनी (अकरावी फेरी) आघाडीवर आहेत. चंदगडमधून शिवाजी पाटील 2900 मतांनी (सातवी फेरी)आघाडीवर आहेत. चंदगडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याने मतदारांचा कौल कोणाला, याची उत्सुकता आहे. महायुती अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात भाजपचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली आहे.

करवीरमधून चंद्रदीप नरके आघाडीवर

करवीरमधून शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रदीप नरके 8781 मतांनी (आठवी फेरी) आघाडीवर आहेत. हातकणंगलेमधून अशोकराव माने 21432 मतांनी (आठवी फेरी) आघाडीवर आहेत. हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत आहे. येथे विद्यमान आमदार काँग्रेसचे राजूबाबा आवळे विरुद्ध महायुती पुरस्कृत जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांच्याशी सामना होत आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महायुती २२१ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप १२७, शिंदेंची शिवसेना ५६ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ३८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी ५० जागांवर आघाडीवर आहे. इतर १७ जागांवर आघाडीवर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT