गोरंबे : गोरगरिबांचा कळवळा असलेला संपूर्ण राज्यामधील एकमेव नेता म्हणजे हसन मुश्रीफच आहेत. गोरगरिबांचे हित हे केवळ मुश्रीफच करू शकतील, म्हणूनच त्यांना पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. गोस्त्रे (ता. कागल) येथील प्रचार सभेत माजी घाटगे बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, 'गोकुळ'चे संचालक अंवरिष घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घाटगे म्हणाले, व्हनाळी, साके, गोरवे, केनवडे, शेंदूर या पांढऱ्यापट्ट्यातील शेतकरी कष्टाने जीवन जगत होते. म्हणूनच अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून हरितक्रांती झाली. मात्र, आमचा ऊस गुलाल टाकूनच नेला जात होता. म्हणून येथे साखर कारखान्याची गरज होती. त्यामध्येसुद्धा प्रचंड अडचणी निर्माण झाल्यानंतर या साखर कारखान्याला विरोधात असतानाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठ्या मनाने सहकार्य केले, अशा नेतृत्वाला जपणे ही काळाची गरज आहे. मुश्रीफ म्हणाले, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि माझ्यामध्ये विधानसभेला गेल्या २५ वर्षांत सहावेळा लढाई झाली. मी सलग पाचवेळा विजयी झालो. नियतीने मला साथ दिली; मात्र बाबांना ती साथ मिळाली नाही. परंतु, कोणतीही संता नसताना २५ वर्षे संजयबाबांनी जीवाभावाचे कार्यकर्ते तळहातावरील फोडाप्रमाणे जपले.
'गोकुळ'चे संचालक अवरिष घाटगे म्हणाले, मागील पाच विधानसभा निवडणुकीतील संजयबाबांचे पराभव है आमच्या जिव्हारी लागले आहेत. आमचे पराभव समरजित घाटगे आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळे झाले आहेत, हे आम्ही विसरणार नाही. या पराभवांचा वचपा या मुश्रीफ यांना विजयी करून काढूया. यावेळी सरपंच सुनीता पाटील, निशिकांत कांबळे, अरुण डोले, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले, स्वागत शहाजी पाटील यांनी केले. प्रास्ताविक जयसिंग पाटील यांनी केले, विष्णुपंत गायकवाड, शंकर सामंत, दत्ता दंडवते, हिंदुराव बुजवडे, तानाजी बुडके, सिद्राम डोले, सी. के. चौगुले विजय आदी उपस्थित होते.
आमच्यावर आलेल्या संकटात मंत्री हसन मुश्रीफ आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि आम्हाला मदत केली, या जाणिवेतून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या निवडणुकीपेक्षा जास्त कष्ट करून मंत्री मुश्रीफ यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.