राशिवडे : राधानगरी भुदरगड व आजरा मतदारसंघातून ए. वाय. पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज साधेपणाने दाखल केला. आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी हरेश सूळ यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी शिवाजी पाटील, नंदूभाऊ पाटील, राजू कवडे, आर. वाय. पाटील, डी. बी. पाटील, नेताजी पाटील, युवराज वारके, अमर पाटील, संदीप पाटील, विलास हळदे, मानसिंग पाटील, शिवाजी भाट, अतूल नलवडे, भगवान पातले उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर ए. वाय. पाटील म्हणाले, राधानगरी मतदार संघात अद्यापही शाश्वत विकास झालेला नाही. माजी आमदार व विद्यमान आमदार यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. खरा विकास काही मला जनतेला दाखवून द्यायचे आहे.