Maharashtra Assembly Polls
भूम येथील तहसील कार्यालयात अर्ज दाखल करताना आरोग्‍यंत्री तानाजी सावंत व पक्षाचे पदाधिकारीPudhari Photo

Maharashtra Assembly Polls | आरोग्‍यमंत्री तानाजी सांवत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज भरण्यापूर्वी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
Published on

भूम ः राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज सकाळी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे दर्शन घेऊन त्यानंतर (दि. २४ )रोजी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भूम येथील तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी महायुतीतील भाजप, अजित पवार गट घटक पक्षातील नेते पदाधिकारी उपस्थित होते.

अर्ज भरतेवेळी मोजकेच कार्यकर्ते

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गाजावाजा न करता मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी धनंजय सावंत, केशव सावंत, गिरीराज सावंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगरध्यक्ष संजय गाढवे , बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, भाजपाचे बाळासाहेब शिरसागर, राष्ट्रवादी काँगेसचे नवनाथ जगताप, अण्णासाहेब देशमुख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कामाची पोचपावती मतपेटीतून दिसेल ः तानाजी सावंत

विकासाचे पर्व गेले ३० ते ४० वर्षे या धाराशिव जिल्हाने कधी पाहिलेच नाही ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मी केलेल्या कामाची पोचपावती २० नोव्हेंबरला मतपेटीत दिसेल. या भागातला मातीत गेलेला दूध संघ, मातीत गेलेली बँक पुन्हा उभा करायची आहे. या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क उभा करायचा आहे. तिन्ही तालुक्यात एमआयडीसी मंजूर केलेले आहे. या एमआयडीसीमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करायचा आहे. छोटे-मोठे उद्योग या एमआयडीसीमध्ये आणायचे आहेत. गुढीपाडव्यापर्यंत उजनीचे पाणी जेऊर बोगदा मार्गे सीना कोळेगाव धरणात येणार असून तेथून भूम वाशी तालुक्यातील छोट्या मोठ्या साठवण तलावामध्ये हे पाणी पोहोचणार आहे. असे सांवत यांनी अर्ज भरल्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news