संजय शिरसाट यांच्यासमोर राजू शिंदेंचा लागणार कस  file photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly Poll : संजय शिरसाट यांच्यासमोर राजू शिंदेंचा लागणार कस

संजय शिरसाट यांच्यासमोर राजू शिंदेंचा लागणार कस

पुढारी वृत्तसेवा
सनील कच्छवे

छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्यासमोर महाविकास आषाडीचे उमेदवार राजू शिंदे यांचा चांगलाच कस लागणार आहे. संजय शिरसाट यांच्याकडील जबरदस्त नेटवर्क, मतदारसंघात त्यांनी केलेली कोट्यवधींची विकासकामे तसेच ठाकरे गटातून शिव सेनेत नव्याने दाखल पदाधिकाऱ्यांची साथ या सर्व गोष्टींचा शिरसाट यांना प्रत्यक्ष निवडणुकीत लाभ होऊ शकतो. तर दुसरीकडे राजू शिंदे यांच्याकडे मात्र ठाकरे गटाबा कमिटेड वोटरवगळता इतर ठोस गोष्टींचा अभाव असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतींमध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील लहत ही एक मानली जात आहे. या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणूकः रिंगणात आहेत, तरीदेखील प्रमुख लबत ही महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट, माहविकास आघाडीचे राजू शिंदे आणि चंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंजन साळवे या तिघांमध्ये होणार असल्याचे दिसत आहे. संजय शिरसाट हे गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. महायुतीकडून शिवसेनेने यावेळी पुन्हा त्यांना मैदानात उतरविले आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आपाठीकडून ठाकरे गटाने राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिंदे यांना ऐनवेळी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश घेऊन उमेदवारी दिली गेल्याने ठाको गटातील अनेक पदाधिकाप्ती नाराज झालेले आहेत.

अशा पद्धतीने उमेदवार आयात केल्यामुळे ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिरसाट यांची काहीसी भक्कम झाली आहे. शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत. परंतु ते ज्या भागाचे नगरसेवक आहेत तो भाग पूर्व मतदारसंघातील आहे. त्यामुळे ते मतदारसंघाबाहेरील असल्याचा मुद्दाही त्यांना अडचणीचा ठरू शकतो. दुसरीकडे शिरसाट यांनी गेल्या पाच वर्षांत सातारा देवळाई, बजाजनगर वाळूज यासह मतदारसंघातील अनेक भागांत रस्ते, ड्रेनेज यासारखी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचेही मोठे नेटवर्क आहे. अशा परिस्थितीत तुलनेने मतदारसंघात नवे असलेले राजू शिंदे यांचा कस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिंदेंना मित्र पक्षांची साथ किती?

पश्चिम मतदारसंघात राजू शिंदे यांना महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची किती साथ मिळणार याविषयी साशंकता आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. प्रथारात काँग्रेसला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीत जागावाटपात पश्चिम मतदारसंग कब्रिसला मिळावा यासाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील होते. मात्र, त्यात या पदाधिकाऱ्यांना यश आले नाही.

पश्चिम मतदारसंघ

जमेची बाजू

• सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी,

• मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून झालेली कोट्यवधींची विकास कामे,

• कार्यकतें, पदाधिकारी यांचे जाळे

कमकुवत बाजू

  • एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे समर्थकांची नाराजी

  • ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मतदारसंघावर दिलेले लक्ष

जमेच्या बाजू

  • पक्ष फुटीनंतर ठाकरे गटाच्या मतदारांमध्ये असेलली महानुभूती

  • मागीलवेळी पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढविल्याचा अनुभव

  • मतदारसंघात एमआयआमचा प्रतिस्पर्धी उमेदवार नसणे.

कमकुवत बाजू

  • आयात उमेदवार असा होणारा प्रचार

  • ठाकरे गटातील काही पदाधिकारी प्रचारापासून अलिप्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT