नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांची काल धर्माबाद येथे सभा झाली. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यावर तोंडसुख घेतले. काँग्रेस अत्यंत अडचणीत असताना स्व. खा. वसंतराव चव्हाण यांनी बाजू सांभाळून घेतली. ते जनसामान्यांसाठी लढले. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. त्यामुळे ही पोट निवडणूक लागली असून या जागेवर खरा हक्क वसंतराव चव्हाण यांच्या सुपुत्राचा प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांचाच आहे. त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन जनसामान्ऱ्यांनी वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशी अपेक्षा राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांनी व्यक्त केली.
व्यासपीठावर यावेळी खासदार सुरेश शेटकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण, नायगाव विधानसभेचे उमेदवार, शिरीष गोरठेकर, जाकीर चाऊस, गणेशराव पाटील गोरठेकर, जाकीर चाऊस, गणेशराव पाटील करखेलीकर, रवी पाटील खतगावकर, अकोला ललिता, नागोराव पाटील रोशनगावकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना इमरान प्रतापगढी म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी ४०० पारचा नारा दिला होता, हा नारा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मजबुतीने त्यांच्या मागे उभा राहिला परिणामों धनशक्ती एकत्र वाटली तरी सामान्यांनी स्व. वसंतराव चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी केले. दुर्दैवाने ते आज नाहीत. परंतु, त्यांचे प्रतिनिधित्व त्यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र बव्हाण हे दिल्लीत करतील. त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे आणि स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी, असे इम्रान प्रतापगडी म्हणाले.
यावेळी प्राध्यापक रविंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेला मीनाक्षी काकडे, भास्कर भिलवंडे, सदाशिव पप्पुलवाड, अरुण पाटील एकंबेकर, गंगाधर तोडरोड, राजू पाटील ढगे, जावेदभाई, गोविंद हनवटे, जयश्री भरणे, रंजना सोनकांबळे यांच्यासह मविआचे असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.