काँग्रेसकडून ४५ सदस्यीय प्रचार समिती जाहीर करण्यात आली आहे.  Pudhari File Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: काँग्रेसची ४५ सदस्यीय प्रचार समिती जाहीर

Maharashtra Assembly Polls| Congress | काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे समितीचे अध्यक्ष

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४५ सदस्यीय प्रचार समिती जाहीर केली. काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे या समितीचे अध्यक्ष आहेत तर नाना गावंडे निमंत्रक आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड,.खा. प्रणिती शिंदे, खा. इमरान प्रतापगडी, खा. कल्याण काळे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेस नेते सुनील केदार, भाई जगताप, उल्हास पवार, सचिन सावंत, संध्या सव्वालाखे अशा प्रमुख नेत्यांचा या समितीमध्ये समावेश आहे. राज्यभरात प्रचाराचे व्यवस्थापन बघणे आणि त्यासंबंधी नियोजन करण्याची जबाबदारी या समितीकडे असणार आहे.

या समितीमध्ये अन्य सदस्यांमध्ये काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, कुमार केतकर, अशोक पाटील, अनिस अहमद, मोहन जोशी, चारुलता टोकस, अभिजीत वंजारी, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, रामहरी रूपणवार, एम. एम. शेख, मुनाफ हकीम, चरणसिंह सापरा, राजाराम पानगव्हाणे, राजेश शर्मा, शरद अहेर, महेंद्र घरत, किशोर बोरकर, जानेत डिसुझा, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, भानुदास माळी, इब्राहिम भाईजान, कमल फारुख, अनिशा बागुल, सूर्यकांत पाटील, डॉ. हेमलता पाटील, मोहन देशमुख, प्रवीण देशमुख, सुनील अहिरे, अनिस कुरेशी आणि अशोक धवड यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT