मंगळवारपासून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकृती Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज

Nashik : जिल्ह्यात १५ जागांसाठी प्रक्रिया : प्रशासकीय तयारी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, जिल्ह्यातील १५ मतदारसंघांसाठी मंगळवार (दि. २२)पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ होत आहे. अर्ज भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

महाराष्ट्रातील 15 व्या विधानसभेसाठी निवडणुका घोषित झाल्या आहेत. राज्यातील २८८ मतदारसंघांत २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, २३ तारखेला मतमोजणी करण्यात येईल. निवडणुकीसाठी उमेदवारांना मंगळवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा आहेत. या सर्व जागांकरिता अर्ज दाखल करण्याची अधिसूचना मंगळवारी (दि. २२) प्रसिद्ध करण्यात येईल. त्या क्षणापासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात हाेणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून 15 ही मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. दरम्यान, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबर आहे. या कालावधीत शनिवार (दि. २६) व रविवार (दि. २७) असे दोन दिवस शासकीय सुटी असल्याने त्यादिवशी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यांचे काटेकोर पालन उमेदवारांनी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उमेदवारी अर्जासाठी महत्त्वाचे

  • सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज विक्री व दाखल प्रक्रिया

  • उमेदवारांना परिपूर्ण अर्ज भरणे आवश्यक

  • एका उमेदवाराला जास्तीत-जास्त चार अर्ज भरण्याची मुभा

  • निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारासह पाच व्यक्तींना प्रवेश

  • निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आवारात उमेदवारांच्या तीन वाहनांना प्रवेश

  • राखीव उमेदवारासाठी ५ हजार, खुल्या उमेदवारासाठी १० हजार रुपये अनामत रक्कम

  • दैनंदिन खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार

  • फौजदारी प्रकरणांबाबत उमेदवारांना जाहीर प्रसिद्धी देणे बंधनकारक

उमेदवारी अर्ज भरण्याचे ठिकाण असे...

  • मतदारसंघ - निवडणूक निर्णय अधिकारी - ठिकाण

  • नांदगाव - उपजिल्हाधिकारी ( रोहयो) - तहसील कार्यालय, नांदगाव

  • मालेगाव मध्य - उपविभागीय अधिकारी मालेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय, मालेगाव

  • मालेगाव बाह्य - उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. - 2 - तहसील कार्यालय, मालेगाव

  • बागलाण - उपविभागीय अधिकारी - तहसील कार्यालय, बागलाण

  • कळवण - उपविभागीय अधिकारी, कळवण - सहायक जिल्हाधिकारी कार्यालय, मानूर

  • चांदवड - उपविभागीय अधिकारी - उपविभागीय अधिकारी कार्यालय, चांदवड

  • येवला - उपविभागीय अधिकारी - तहसील कार्यालय, येवला

  • सिन्नर - उपजिल्हाधिकारी भूसंपादन (वैतरणा) - तहसील कार्यालय, सिन्नर

  • निफाड - उपविभागीय अधिकारी - उपविभागीय अधिकारी कार्यालय, निफाड

  • दिंडोरी - उपविभागीय अधिकारी - उपविभागीय अधिकारी कार्यालय, दिंडोरी

  • नाशिक पूर्व - उपजिल्हाधिकारी (प्रशासन) - नाशिक उपजिल्हाधिकारी (प्रशासन) दालन जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

  • नाशिक मध्य - उपविभागीय अधिकारी, नाशिक - उपविभागीय कार्यालय, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आवार

  • नाशिक पश्चिम - जिल्हा पुनवर्सन अधिकारी - पुनवर्सन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

  • देवळाली - उपजिल्हाधिकारी (विशेष भूसंपादन) - अटल दिव्यांग स्वाभिमान भवन, वल्लभनगर नाशिक

  • इगतपुरी - उपविभागीय अधिकारी - उपविभागीय अधिकारी, इगतपुरी

  • जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT