Seema Hiray | सीमा हिरेंना उमेदवारी; इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी

काहींचा बंडाचा इशारा, तर काहींची 'वेट ॲण्ड वॉच' भूमिका
Seema Hiray
Seema Hiray Pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यावरच विश्वास दर्शवित उमेदवारी घोषित केल्याने, इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजीची लाट पसरली. अनेकांनी थयथयाट करीत, बंंडखोरीची तयारी दर्शविली, तर काहींना अजूनही पक्षाकडून फेरबदलाची अपेक्षा असल्याने ते 'वेट ॲण्ड वॉच' भूमिकेत आहेत.

भाजपने रविवारी (दि. २०) तब्बल ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली. या मतदारसंघातील इच्छुकांच्या गटाकडून दोन दिवसांपासून सीमा हिरे यांना उमेदवारी देऊ नये, अशा प्रकारची भूमिका घेतल्याने पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर आली. हा वाद तीव्र होत असतानाच, हिरे यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने इच्छुकांच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. काहींनी थेट मुंबई गाठत पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या, तर काहींनी हिरे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, हिरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने, बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

लोकसभेत थांबवल्यानंतर विधानसभेचा शब्द मिळाल्याने, पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत प्रचार करत आहे. त्यामुळे उमेदवारी नाही मिळाली, तरी आता थांबणे अशक्य आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच आहे.

दिनकर पाटील, माजी सभागृह नेते, नाशिक.

स्थानिक पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असताना पक्षाने विद्यमान आमदारालाच उमेदवारी देणे हास्यास्पद आहे. उमेदवारी देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना तसेच संघाला विचारात घेतले नसल्याने नाराजी कायम आहे.

शशिकांत जाधव, माजी नगरसेवक, नाशिक.

पक्षाने नवीन चेहरा द्यावा, ही आमची आग्रही मागणी अजूनही कायम आहे. पक्षश्रेष्ठींकडे नाराजी कळवली आहे. बदल होईल ही अपेक्षा असून, आम्ही 'वेट ॲण्ड वॉच' भूमिकेत आहोत.

प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ते, भाजप, नाशिक.

Seema Hiray
मोठी बातमी! यादी जाहीर; भाजपाकडून नाशिक पश्चिममधून हिरे यांना पुन्हा तिकीट

स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विचार करता पक्षाने नवीन चेहरा द्यावा यासाठी एकत्र आलो होतो. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्यानंतर भूमिका वेगळी असू शकते. आता हिरे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू.

लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते, नाशिक.

इच्छुक आज भूमिका स्पष्ट करणार

नाराज झालेल्या इच्छुकांच्या गटाकडून सोमवारी (दि. २१) भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. पक्षाने पुनर्विचार करावा, ही मागणी इच्छुकांची आहे. याशिवाय इच्छुकांपैकी कोणास उमेदवारी द्यायची काय? याचादेखील विचार केला जाऊ शकतो. याशिवाय काही इच्छुकांकडून राजीनामास्त्रही उगारले जाऊ शकते.

मी तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत असून, स्थानिक व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मला पूर्ण पाठिंबा मिळत आहे. या पाठिंब्याच्या आधारावरच मी विजय मिळविणार आहे.

आमदार सीमा हिरे, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news