कराड : कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय काँग्रेसकडून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाने गुरुवारी रात्री महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. यात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.
त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर मागील दहा वर्षे ते विधानसभेत कराड दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गतनिवडणुकीत नऊ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवणार्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा सलग तिसर्या निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्याशी सामना होत आहे.