Anil Deshmukh
File Photo
महाराष्ट्र

विधान परिषद निकालानंतर अनिल देशमुखांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,"विकले गेलेले..."

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचा दणक्यात विजय झाला. महायुतीने रिंगणात उतरविलेले सर्वच नऊ उमेदवार विजयी झालेे. महाविकास आघाडीतील शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने महायुतीने या निवडणुकीत महाविकास आघाडीला चित केल्याचे स्पष्ट झालेे. या पार्श्वभुमीवर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. Anil Deshmukh

विकले गेलेले आणि विकत घेणारे...

शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटंल आहे, "आज विकले गेलेले आणि विकत घेणारे दोघांनीही लक्षात ठेवावं. तुम्ही घोडेबाजारातील यशस्वी दलाल असाल, आम्हीही जमीन कसणारे बुलंद शेतकरी आहोत. भेटू विधानसभेच्या रणांगणात !"

अनिल देशमुख यांच्या पोस्टची सोशल मिडियासह राजकीय वर्तुळात चर्चेला आले आहे.

महायुतीचा दणक्यात विजय

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचा दणक्यात विजय झाला. महायुतीने रिंगणात उतरविलेले सर्वच नऊ उमेदवार विजयी झालेे. महाविकास आघाडीतील शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने महायुतीने या निवडणुकीत महाविकास आघाडीला चित केल्याचे स्पष्ट झालेे. महायुतीच्या मतांना सुरुंग लावून महाविकास आघाडी आपले तीन उमेदवार निवडून आणेल, हे अंदाज फोल ठरवीत उलट महायुतीनेच महाविकास आघाडीच्या मतांना सुरुंग लावला असून, काँग्रेसची किमान सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

SCROLL FOR NEXT