अहमदनगर

नगर : संजीवनी बी. फार्मसी-आयएसएफ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये करार

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा: संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालय व मोगा (पंजाब) येथिल आय. एस. एफ. कॉलेज ऑफ फार्मसी या दोन संस्थांमध्ये मोगा येथे समजोता करार झाला आहे. विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान देण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेच्या काळात खंबीरपणे आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्ये विकसीत करण्यासाठी संजीवनीने टाकलेले हे महत्वपुर्ण पाऊल आहे, अशी माहिती संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या समवेत संजीवनी फार्मसीचे डायरेक्टर डॉ. किशोर साळुंखे, डॉ. विपुल पटेल, डॉ. सरीता पवार, डॉ. सीमा गोसावी आणि आयएसएफ कॉलेज ऑफ फार्मसीचे डायरेक्टर डॉ. जी. डी. गुप्ता, व्हा. प्रिन्सिपाल डॉ. आर. के. नारंग, डॉ. सिध्दार्थ मेनन व डॉ. पुजा चावला यांनी परस्पर संस्थांशी समजोता करार केला.

या करारानूसार दोनही संस्थांच्या विद्यार्थ्यांमध्ये औषधनिर्माणशास्त्र संदर्भातील आधुनिक ज्ञान वृध्दीसाठी परीसंवाद, कार्यशाळा आयोजीत करणे, फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम राबविणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये शोध निबंध सादर करणे, विविध ठिकाणच्या स्पर्धांमध्ये औषधनिर्माण संदर्भात प्रकल्प सादर करणे, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविणे,

परस्पर संस्थांचे ग्रंथालये, प्रयोगशाळा, सॉफ्टवेअर्स वापरणे तसेच एकमेकांना आवश्यक तेथे तांत्रिक सहाय्य करणे, अशा परस्पर समजोत्याचे स्वरूप आहे. संजीवनी बी फार्मसी महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष 2022-23 पासुन शैक्षणिक स्वायत्ता संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे. विनाअनुदानित वर्गवारीत संजीवनी फार्मसी ही संस्था महाराष्ट्रातील पहिली आहे, तर देशात नववी आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT