अहमदनगर

श्रीरामपूर : पंढरपूर वारीसाठी आता थेट गावातून एसटी बस

अमृता चौगुले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जावू इच्छिणार्‍या भाविकांसाठी आता थेट गावातून स्वतंत्र एस. टी. बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे श्रीरामपूर एस. टी. आगाराचे व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.

गावातून पंढरपूरला जाण्यासाठी 45 प्रवाशांचा समूह असल्यास एस. टी. बस थेट गावात येवून प्रवाशी वारकर्‍यांना घेवून पंढरपूरला जाईल. तेथे मुक्कामानंतर दसर्‍या दिवशी बस पांडुरंगाच्या दर्शनानंतर यात्रेकरूंना घेवून पुन्हा त्यांच्या गावात सोडणार आहे.
पंढरपूरपर्यंत जाणे व पुन्हा त्याच बसने परत येणे अथवा फक्त गावातून पंढरपूरला सोडणे, असे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत.

तिकिटाचा माफक दर ठेवला आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक शिवदे यांनी दिली. अधिक माहितीसाठी आगारात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT