कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील आपेगाव शिवारातील भुजाडे या वृद्ध दाम्पत्याचा खून करून सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा सोने-चांदी मुद्देमाल रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिली.
मुलगा जालिंदर दत्तात्रय भुजाडे (वय 40, धंदा नोकरी, रा. आपेगाव ता. कोपरगाव हल्ली मु.. संतोषनगर (वाकी) ता. खेड, जि. पुणे यांनी तशी फिर्याद दिली असून पोलिस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, 30 मे रोजी रात्री ते 1 जून च्या दरम्यान फिर्यादीचे घरी (आपेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथे ही घटना घडली होती. या गुन्ह्याची माहीती पो. स्टे. ला देण्यात आली. यानंतर पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या.
मयत यांच्या घरातून गेला माल 50 हजार, दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. तसेच बँकेचे पासबुक चोरून नेले. या घटनेत दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय 75, रा. आपेगाव, ता. कोपरगाव), राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65, रा. आपेगाव ता. कोपरगाव) हे दोघे मयत झाले होते. त्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय व पीएमटी हॉस्पिटल लोणी, ता. राहाता येथे करण्यात आले होते. या घटनेने सर्वत्र खळबळ उडालेली आहे.