शेवगाव तालुका : वृत्तसेवा
एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अत्याचारीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन रवींद्र मोहन कोपरगे (वय 35) याच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
1 जून रोजी रात्री घरात सर्व जण जेवण करीत असताना पीडित मुलगी रडत घरी आली. तिने रवींद्रने धमकावत अत्याचार केल्याचे सांगितले. त्याच्याकडे गेलो असता तो पळून गेला. त्यानंतर मुलीला शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून पुढील उपचारासाठी नगरला दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके करीत आहेत. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.