अहमदनगर

भालगावची पूजा खेडकर होणार जिल्हाधिकारी!

अमृता चौगुले

खरवंडी कासार : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी तालुक्यातील भालगावची पूजा दिलीप खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून आयएएस केडर मिळविले आहे. पूजाच्या आईचे वडील (आजोबा) जगन्नाथराव बुधवंत (आयएएस) होते. पुजाचे वडील दिलीप खेडकर प्रदूषण आयुक्त आहेत. पुजाची आई डॉ. मनोरमा खेडकर भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

पूजा जिल्हाधिकारी होणार आणि महत्त्वाचे म्हणजे तिला महाराष्ट्र केडर मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांचा आनंद द्विुगुणीत झाला. घरची अनुकूल परिस्थिती होती. घरात सर्व सुख नांदत असताना पूजाने जिद्दीने अभ्यास केला. तिचे आजोबा जगन्नाथराव बुधवत हे जिल्हाधिकारी होते. त्यांची इच्छा माझ्यानंतर माझ्या सारखे कुटुंबातील कोणीतरी असावे, हे ते बोलून दाखवत असत.

पूजाने त्यांची व आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली. भालगाव सारख्या ग्रामीण भागातील माणसाच्या वेदना पूजाने डोळ्याने पाहिल्या व अनुभवल्या आहेत. तिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश सपांदन केले. महिलांमधून ती राज्यात वंजारी समाजाची एकमेव असल्याने व थेट जिल्हाधिकारी म्हणून निवड होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी तिच्या पदाचा नक्की उपयोग होईल. पूजा खेडकरच्या या यशाने भालगावमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

माझे आजोबा जगन्नाथराव बुधवंत जिल्हाधिकारी होते. मी त्यांच्याकडेच लहानची मोठी झाले. त्यांचा व माझे वडील दिलीप खेडकर, आई डॉ. मनोरमा खेडकर यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. मला संधी द्या, मी देशसेवेत नक्की नावलौकिक करील. असा विश्वास नेहमी कुटुंबाला देत होती. यशाचे श्रेय माझे आजोबा, आई-वडील, चुलते यांनाच जाते.
– पूजा खेडकर आयएएस, महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT