अहमदनगर

बोर्ले सोसायटीत एकास एक उमेदवार

अमृता चौगुले

नान्नज : पुढारी वृत्तसेवा

जामखेड तालुक्यात राजकीयद़ृष्ट्या प्रतिष्ठेच्या बोर्ले सेवा संस्थेच्या 13 जागांकरिता 42 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याचा दि. 31 मे अखेर 18 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून एक जागा बिनविरोध काढण्यात उपसरपंच जालिंदर चव्हाण यांच्या पॅनेलला यश आले.

बोर्ले सेवा संस्थेच्या 13 जागांकरीता 42 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याचा दि. 31 मे अखेर 18 उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली. एक जागा बिनविरोध झाली असून 12 जागांकरिता 24 उमेदवार रिंगणात उतरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी दिली.

या संस्थेसाठी 444 सभासद मतदानाचा हक्क बजावणार असून या सेवा संस्थेसाठी दि. 12 जून रोजी मतदान घेण्यात येणार असून याच दिवशी मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बोर्ले सेवा संस्थेची निवडणूक जाहीर होताच गावातील राजकीय हालचालींना मोठा वेग आला.

बोर्ले गावचे उपसरपंच जालिंदर चव्हाण, माजी चेअरमन सचिन चव्हाण, माजी सरपंच कृष्णा चव्हाण, माजी सरपंच सुधीर चव्हाण, ग्रा. पं. सदस्य गणेश चव्हाण यांच्या पॅनेलने एक जागा बिनविरोध काढण्यात यश मिळविले असून माजी सरपंच भारत काकडे, विद्यमान सरपंच सचिन काकडे, प्रताप पाटील, माजी संचालक परमेश्वर काकडे, युवा नेते सुधीर काकडे यांच्या पॅनलमध्ये आता 12 जागेकरिता एकास एक अशी चुरशीची लढत होणार आहे.

SCROLL FOR NEXT