अहमदनगर

नगर : सराफाला एक लाखाला गंडविले; गुन्हा दाखल

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : दोन तोळ्याची सोनसाखळी विकत घेऊन पैसे ऑनलाईन पाठविल्याचा मेसेज दाखवून एक लाख 10 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कमलेश राजेंद्र मुथा (46, रा. माणिकनगर) असे फसवणूक झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून आनंदकुमार पल्ली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदकुमार पल्ली याने दुकानात येऊन दोन तोळेची सोन्याची चेन दाखविण्याचे फिर्यादी यांना सांगितले. चेन खरेदीनंतर 1 लाख 10 हजार 800 रुपये एनएफटी करतो, असे सांगून त्यान मुथा यांच्याकडून बँक डिटेल्स घेतले. त्यानंतर पैसे पाठविल्याचा मेसेज मोबाईलमध्ये दाखवून तो तेथून निघून गेला. त्यानंतर बँकेत चौकशी केल्यानंतर फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल झाला आहे.

SCROLL FOR NEXT