अहमदनगर

नगर शिक्षक बँक निवडणूक: लंकेंसह 25 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज बाद

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षक बँकेसाठी विक्रमी 852 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काल झालेल्या छाननीत 25 इच्छुकांचे अर्ज बाद झाल्याची माहिती सहकार विभागाच्या वतीने देविदास घोडेचोर यांनी दिली. शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वच शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या अर्जांची काल शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात छाननी झाली. त्यामध्ये, ठेवी अपूर्ण असणे, सुचकाची सही नसणे, दुसर्‍या मतदार संघातून अर्ज भरणे, अनुमोदक स्वाक्षरी नसणे, प्रतिज्ञापत्रावर सही नसणे इत्यादी कारणांतून 25 इच्छुकांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.

बाद झालेल्या अर्जांमध्ये राजेंद्र कडलग , अविनाश बोधक , कैलास वाघमारे , नासिर मणियार, विकास खेबडे (सर्व संगमनेर), हेमंत भागवत ( नगर), संगिता घोडके (भिंगार), हुसेन शेख ( श्रीरामपूर), विजयकुमार लंके ( श्रीगोंदा), वर्षा म्हस्के ( पाथर्डी), सुनील झावरे ( राहुरी), पांडुरंग झरेकर (नगर), रघुनाथ झावरे ( पारनेर), प्रमोद गाढे ( कर्जत), आरती कोरडकर ( कोपरगाव), अभय ठाणगे ( नगर), रजनीकांत साखरे ( जामखेड), शोभा कोकाटे ( पारनेर), योगिता दिघे ( संगमनेर), वर्षा म्ह्स्के ( पाथर्डी), महेंद्र भणभणे ( नगर), प्रल्हाद भालेकर ( पारनेर), राजेंद्र कडलग ( संगमनेर), संजय म्हस्के (नगर), संजय ओहोळ ( श्रीगोंदा), यांचा समावेश आहे.
दरम्यान, 27 जून ते 11 जुलैपर्यंत अर्ज माघारीचा कालावधी असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT