अहमदनगर

नगर : शाळांची गुणवत्ता, दर्जा उंचावला : नीलेश लंके

अमृता चौगुले

सुपा, पुढारी वृत्तसेवा: पारनेर तालुक्यातील शाळांची आमदार लंके व पथकाने शाळा तपासणीस सुरुवात केली. हंगा, सुपा (जांभुळवाडी, पवारवाडी) शाळांच्या प्रत्येक वर्गात जाऊन पथकाने पाहणी केली. मुलांशी चर्चा करतानाच त्यांची अक्षरे पाहिली. काही मुलांच्या अक्षरांवरूनच सुपा परिसरातील प्राथमिक शाळांची गुणवत्ता व दर्जा उंचावल्याची भावना आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली.
प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तालुक्यातील निवृत्त शिक्षकांचे एक पथक आमदार लंके यांनी तयार केले.

पथकाने नुकतीच हंगा, सुपा शाळेत जाऊन पाहणी केली. जांभुळवाडी शाळेत मुख्याध्यापक कांता बनकर कांता यांनी आमदार लंके यांचे स्वागत केले. शाळेसाठी मैदान व वर्गखोेल्यांची मागणी केली. या शाळेतील स्वराली सचिन कर्डिले, अराध्या बबन रूके, पृथ्वीराज संजय करचे हे एनएसएसई मंथन परिक्षेत राज्याच्या यादीत चमकले. शिक्षक सुवर्णा पवार, मीना चाकणे, मनीषा ताजवे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अधिक भर दिला आहे.

पवारवाडी शाळेत यांचे मुख्याध्यापिकस ज्योती कोल्हे यांनी आमदार लंके यांच्या पथकाचे स्वागत केले. दोन वर्ग खोल्या, दोन शिक्षक, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, ग्रंथालय व एलईडी प्रोजेक्टर, पाणी फिल्टरची मागणी शिक्षकांनी केली. पवारवाडी शाळेची पटसंख्या सुरुवातीस 13 होती. मुख्याध्यापिकाज्योती कोल्हे शाळेत बदलून आल्यापासून पटसंख्या 110 वर पोहचली आहे.

प्रत्येक गावात प्राथमिक शाळा असताना देखील या शाळेत सुपा, कामरगाव, मठवस्ती, वाळवणे, रांजणगाव मशिद या गावांतून प्राथमिक शिक्षणासाठी विद्यार्थी येत आहेत. ज्योती कोल्हे यांना जिल्ह्याचा गुरूनारी शक्ती पुरस्कार, सुपा गावच्या आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित, तर राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. तालुक्यातून नवोदय परिक्षेसाठी 11 विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी 4 विद्यार्थी पवारवाडी शाळेतील आहेत. शिष्यवृत्ती व मंथन अशा विविध स्पर्धा परिक्षेत या शाळेचे विद्यार्थी राज्यात चमकले आहेत.

शाळा तपासणीत आमदार नीलेश लंके, मुख्याध्यापक ज्योती कोल्हे, कांता बनकर, उपसरपंच दत्ता पवार, गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, विस्तार अधिकारी कांतिलाल ढवळे, केंद्रप्रमुख अविनाश गांगर्डे, शिक्षक वर्षा साठे, सुरेखा पवार, पल्लवी काळे, आशा पोपळघट, निकिता पवार, माजी सरपंच विजय पवार, किरण पवार, सचिन काळे, सचिन साठे, सचिन पवार, शरद पवार, शिवाजी पवार, राहुल पवार, गोविंद पठारे, विलास पवार, हरि पवार, अ‍ॅड. सुरेश नेटके, तबसूम शेख यावेळी उपस्थित होते.

प्राथमिक शाळांचा स्तर सुधारण्यासाठी मी स्वतः तालुक्यात लक्ष घातले आहे. 100 मुलांची पटसंख्या असताना त्या शाळेत कोणत्या अडचणी येतात. शाळेला किती निधी देता येईल, याचा विचार करून तालुक्यात पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये निधी आणला आहे. पहिल्या टप्प्यात 20 शाळा व दुसर्‍या टप्प्यात बाकीच्या शाळांची तपासणी करून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता सुधारण्याचा उद्देश आहे. शाळेला आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणी करावी.

                                                       नीलेश लंके, आमदार

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT