अहमदनगर

नगर : पोलिस अधिकार्‍याला दम देणार्‍यास अटक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांना व्हॉट्स अ‍ॅप आणि टेक्स मेसेज करून शिवीगाळ, दमदाटी करणार्‍या आरोपीला तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सनिल शिंदे (32, रा. बदलापूर ईस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 28 ऑगस्ट, 2021 रोजी शिंदे याने पिंगळे यांना व्हॉट्स अ‍ॅप व टेक्स मेसेज करून गुन्ह्यात मदत केली नाही, तर तू आतापर्यंत किती भ्रष्टाचार केला आहे, ते बाहेर काढेल, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली होती.

या प्रकरणी पिंगळे यांच्या फिर्यादीवरून शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून शिंदे पसार होता. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलिस अंमलदार शैलेश गोमसाळे, गौतम सातपुते, दत्तात्रय जपे यांच्या पथकाने आरोपी शिंदे याला मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक गडकरी करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT