अहमदनगर

नगर : दारुच्या नशेत पोलिस अधिकार्‍यांना शिवीगाळ

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोतवाली पोलिस ठाण्यात चार जणांनी दारूच्या नशेत गोंधळ घालत वरिष्ठ अधिकार्‍यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत सहायक फौजदार बहिरनाथ ढगे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल किसन बत्तीन (वय 29, रा.शेरकर गल्ली, तोफखाना), सागर हरिभाऊ सोबले (वय 21, रा.कायनेटीक चौक), प्रशांत बाळासाहेब ढलपे (वय 38, रा.चितळरोड) व अमित राजकुमार सावंत (वय 36, रा. भराडगल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी सायंकाळी आरोपी कोतवालीच्या ठाणे अंमलदार कक्षात आले.

राहुल गवळी नामक इसमाकडून मटक्याचे 80 हजार घेणे असून, तो पैसे देत नाही, असे म्हणत आरोपींनी मोठा गोंधळ घातला. आरडाओरड झाल्याने उपस्थित कर्मचार्‍यांनी आरोपींना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. यातील राहुल बत्तीन याने सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांना उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. पोलिस निरीक्षक यांचा देखील एकेरी भाषेत उल्लेख केला.

पाहून घेण्याची भाषा
आरोपी प्रशांत ढलपे हा पोलिस ठाण्यात उपस्थित कर्मचार्‍यांवर दबाव आणण्यासाठी फोनवर मोठमोठ्याने बोलत होता. तसेच, पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून, आम्हाला या ठिकाणी आणून बसविले. 'पोलिसांना दाखवतो आम्ही काय आहे ते' अशी भाषा वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT