नगर: पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वच शिक्षक संघटनांचे मेळावे, बैठका, कार्यशाळाही सुरू आहेत. रविवारी शाळेला सुट्टी असली, तरी शिक्षकांनी मात्र नगरमध्ये ठिकठिकाणी आपली कार्यशाळा भरवलेली दिसली. त्यात इच्छुकांचे अर्ज भरून घेतल्यानंतर आज हे अर्ज निवडणूक विभागाकडे सादर केले. सोमवारी दुसर्या दिवसअखेर 1085 अर्जांची विक्री झाली असून, 125 इच्छुकांचे उमदेवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच मंडळांनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. त्यासाठी रविवारी नगरमध्ये ठिकठिकाणी 'वॉर रुम' तयार झाल्याचे दिसले.
सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी नगरमध्ये नाथकृमा मंगलकार्यालयात कार्यशाळा घेवून इच्छुकांचे अर्ज भरून घेतले. गुरुकूल मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर यांनी कोहीनूर मंगल कार्यालयात कार्यशाळा घेवून इच्छुकांचे अर्ज घेतले. तर, रावसाहेब रोहोकले यांच्या मार्गदर्शनात 'ओम गार्डन'वर कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेवून इच्छुकांचे अर्ज भरले. ऐक्य मंडळानेही राजेंद्र निमसे यांच्या मार्गदर्शनात तालुकानिहाय अर्ज भरले आहेत. सदिच्छाचे राजेंद्र शिंदे यांनीही एन.आर. लॉन्स येथे इच्छुकांचे अर्ज भरले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश पूरी, तर त्यांना सहायक म्हणून देविदास घोडेचोर हे काम पाहत आहेत.
सर्वसाधारण मतदारसंघ
संजय कडलग, राजू देशमुख, राजेंद्र कुदनर, शिवाजी आव्हाड, दिपाली रेपाळ, चंद्रकांत कर्पे (सर्व संगमनेर तालुका), पारनेर तालुक्यातून चंदू मोढवे यांचा एकमेव अर्ज आला. कोेपरगाव रमेश निकम, पितांबर पाटील, विनोदकुमार सोनवणे यांचे अर्ज आले. संतोष भोत, समता वैराट, अरूण मोकळ, मिलिंद खंडीझोड, सतीश मुन्तोडे (सर्व राहाता तालुका), बाबासाहेब जाधव, मारूती वाघ, विजय काटकर, बाबासाहेब मते, राजेश बनकर, मीना जाधव (सर्व श्रीरामपूर), ज्ञानदेव कोळेकर, रजनीकांत साखरे, अर्चना भोसले, नितीन मोहळकर,
अविनाश नवसरे, जालिंदर राऊत (सर्व जामखेड), सुनील शिंदे, अमोल भंडारी, अनिल कराड, कल्याण कराड, प्रशांत शेळके, सुरेश खेडकर, सुभाष खेडकर, बाप्पासाहेब शेळके, सिताराम सावंत (सर्व पाथर्डी), राहुरीतून सुनील झावरे, सय्यद सय्यदअली जमालभाई, अजय ससे, सुभाष भिंगारदिवे यांचे अर्ज आले. शेवगावमधून बबन ढाकणे, पांडुरंग नागरे, अशोक पवार, संजय काळे, रामनाथ खरड, बाळकृष्ण कंठाळी यांनी अर्ज दाखल केले आहेत.
श्रीगोंद्यातून संदीप मोटे, आबासाहेब शेळके, नितीन शेळके, गोवर्धन दरेकर, नारायण देविकर, संतोष शिंदे, रोहिदास डोके, रवींद्र होले आणि सुवर्णा मोहळकर यांचे अर्ज दाखल आहेत. अकोलेतून भागवत लेंडे, सुभाष बगनर, भाऊसाहेब तोरमल, अरूणा दातीर, सीमा पळवे, सतिश डावरे यांचे अर्ज प्राप्त आहेत. नेवासा तालुक्यातून किशोर शिंदे, शशिकांत मोरे, भारत कोतुळे, नवनाथ काळे यांचे अर्ज दाखल आहेत. कर्जत तालुक्यातून अशोक नेवसे, नवनाथ आडसूळ, उध्दव थोरात, अनिता काळे, प्रदीप गावडे आणि रामचंद्र राजापुरे यांनी अर्ज भरले आहेत.
नॉन टिचिंग मतदारसंघ
संजय शिंदे, अल्ताफ शहा, अमोल लांबे, सुनील रहाणे, राजेंद्रकुमार त्र्यंबके, फारूक शहा, विष्णु कांबळे
अनुसूचित जाती व जमाती
शिवाजी आव्हाड, संजय खरे, जगदिश झडे, अशोक पथवे, प्रदीप शेलार, युवराज तळपे
महिला राखीव मतदारसंघ
दीपाली काळे, सारीका लोखंडे, प्रतिभा अंत्रे, विजया खामकर, दीपाली रेपाळ, अरूणा दातीर, अर्चना भोसले, अनिता काळे, अलका भोस, रुपाली धोंडे, शुभांगी शेलार आणि सुवर्णा मोहळकर
ओबीसी मतदारसंघ
मारुती वाघ, भारत कोठुळे, अविनाश नवसरे, उद्धव थोरात, चंदू मोढवे, चंद्रकांत कर्पे, शरद राऊत, संभाजी आळेकर, संजय विधाते, संतोष शिंदे, रोहिदास डोके, रवींद्र होले, मच्छिंद्र तरटे
भटक्या विमुक्त जाती मतदारसंघ
विजय काटकर, सुभाष खेडकर, संभाजी जाधव, शिवाजी खेमनर, राजेंद्र कुदनर, ज्ञानदेव कोळेकर, अमोल भंडारी, अशोक कुसळकर, कल्याण कराड, अनिल कराड, उद्धव दौंड, सुरेश खेडकर, नवनाथ खेडकर, रामदास दहिफळ, शिवाजी शिंदे
हेही वाचा