अहमदनगर

डॉ. पंजाबराव उगलेंना उपमहानिरीक्षकपदी बढती

अमृता चौगुले

नेवासा :पुढारी वृत्तसेवा:  तालुक्यातील कुकाणा परिसरातील देवसडे येथील रहिवासी व ठाणे येथेे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच े एस पी डॉ. पंजाबराव उगले यांना डीआयजीपदी पदोन्नती मिळाली. त्यांची बदली ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाच्या पोलिस आयुक्तपदी झाली.

नाशिक, जळगाव व ठाणे येथे उगले यांनी पोलिस अधीक्षकपदी चमकदार कामगिरी केली. एक कर्तव्यतत्पर आयपी एस अधिकारी म्हणून ते पोलिस खात्यात परिचित आहेत. नाशिक व ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एस. पी. म्हणूनही उगले यांची कारकीर्द उल्लेखनीय व पोलिस यंत्रणेची शान वाढविणारी ठरली.

बुधवारी सुधारित पदस्थापनेत उगले यांना पोलिस अधीक्षक पदावरून पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्यात आली. उगले यांच्यासह राजेंद्र माने व दत्तात्रय शिंदे या एसपींनाही पोलिस उपमहानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिलीे. मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, भाजप नेते सचिन देसरडा व विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके यांनी त्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT