अहमदनगर

कान्हूरपठार गटात साडेसात कोटींच्या कामांना मंजुरी

अमृता चौगुले

कान्हूरपठार : पुढारी वृत्तसेवा : कान्हूरपठार जिल्हा परीषद गटात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन (संशोधन व विकास) अंतर्गत विधान परिषद सदस्या उमा खापरे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून व गिरीष महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यातून साडेसात कोटी रुपयांच्या रस्ता विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली. श्री. कोरडे म्हणाले, स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत संबंधितांच्या अडचणी व गरज लक्षात घेऊन कामांच्या मंजुरीसाठी प्राधान्याने मागणी करण्यात आली होती. या गटात अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून, भाजप सत्तेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून, लवकरच विकासकामांच्या जोरावर या जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदललेला पाहावयास मिळणार आहे.

यावेळी कान्हुरपठार ते लोंढेमळा दोन किमी. 1.50 कोटी, कान्हुर पठार ते रानमळा दोन किमी. 1.50 कोटी, देवीभोयरे ते सरडे वस्ती एक किमी. 75 लाख, वडझिरे ते निघुटमळा एक किमी. 75 लाख, गांजीभोयरे ते पांढरेमळा रोड 1.5 किमी. एक कोटी 12.5 लक्ष, पिंपळनेर ते रासकर वस्ती एक किमी 75 लाख, तर पानोली ते काळोखे मळा 1.5 किमी. एक कोटी 12.5 लाख अशा एकूण सहागावांतील सात ठिकाणच्या 7.50 कोटी रुपये प्रशासकीय रक्कम मंजुर असणार्‍या 10 किलोमीटर लांबीच्या रस्ता कामांना नुकतीच मंजुरी मिळाली असल्याचेही कोरडे यांनी सांगितले. उर्वरीत कामांच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT