अहमदनगर

राहुरी : सहा जणांकडून तरूणास मारहाण; गुन्हा दाखल

अमृता चौगुले

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन 'तू रागाने का पाहतो, असे म्हणत रोहित भिसे या तरूणाला सहा तरूणांनी मिळून फायटर व लोखंडी गजाने बेदाम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना (दि. 25) रोजी स्व. लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय परिसरात घडली. दि. 24 जुलै रोजी स्व. लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयातील तरूणांच्या दोन गटात कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला होता.

त्या कारणावरुन दिनांक 25 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रोहित अभय भिसे हा महाविद्यालय परिसरातील कॅन्टीन समोर असताना सहा तरूण तेथे आले. 'तू आमच्याकडे रागाने का पाहतो' असे म्हणून आरोपी तरूणांनी रोहित भिसे या तरूणाला फायटर, लोखंडी गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ दमदाटी करून 'तू आमच्या नादी लागला तर तुला जिवंत मारून टाकू', अशी धमकी दिली.

जखमी झालेल्या रोहित अभय भिसे (वय 17 रा. मल्हारवाडी) याने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी लुकमान हाफिजोद्दीन शेख, गुड्डू उर्फ शाहीद अशपाक पठाण (दोघे रा. माळी गल्ली, राहुरी) तसेच गणेश तमनर (रा. तमनर आखाडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT