अहमदनगर

वाळकी : पोलिसांनी आवळल्या तरूणाच्या मुसक्या; तलवार जप्त

अमृता चौगुले

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : हातात धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करणार्‍या तरूणाच्या नगर तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. अजय जगन्नाथ बेरड (वय 24, रा. दरेवाडी, ता. नगर) असे या तरूणाचे नाव आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांवर, विक्री करण्यार्‍यांवर कारवाई करण्यासाठी उपनिरीक्षक युवराज चव्हाण, रणजित मारग, हवालदार सुभाष थोरात, कमलेश पाथरूट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विशाल टकले यांचे पथक नेमलेले आहे.

हे पथक नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणार्‍यांवर व विक्री करण्यार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सारोळा बद्धी शिवारात रस्त्यावर विश्वभारती इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढे नवीन बायपासच्या पुलाखाली एक इसम हातात तलवार घेऊन ती विक्री करण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पथक तातडीने तेथे गेले. पोलिस पथकाची चाहूल लागल्याने बेरड तेथून पळून जाऊ लागला. पथकाने पाठलाग करून त्यास पकडले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध कॉन्स्टेबल पाथरुट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT