अहमदनगर

निवडणुका आल्या की काहींना आंदोलन आठवते : आमदार मोनिका राजळे

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी-शेवगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची आमची आग्रही भूमिका होती. तांत्रिक कारणाने कोरडगाव मंडलाचे नाव दुष्काळी यादीत नाही. पुरवणी यादी त्याचा समावेश होईल. परंतु, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींना उपोषण करण्याची हौस आहे. ही मंडळी दुष्काळाचे राजकारण करीत असल्याची टीका आमदार मोनिका राजळे यांनी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड व शेवगावचे माजी सभापती क्षितिज घुले यांचे नाव न घेता करीत जोरदार प्रत्युत्तर दिले.
तालुक्यातील साकेगाव येथे पर्यटन विभागामार्फत एक कोटी रुपये खर्चाच्या सभामंडपाचे लोकार्पण आमदार राजळे यांच्या हस्ते झाले.

संबंधित बातम्या :

त्यावेळी त्या बोलत होत्या. दौंड यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसांपूर्वी शेवगाव-पाथर्डी तालुके दुष्काळी जाहीर करून कोरडगाव मंडलाचा दुष्काळ यादीत समावेश करावा, यासाठी आंदोलन झाले. त्या आंदोलनात दौंड यांच्यासह माजी सभापती क्षितिज घुले यांनी आमदार राजळे यांच्यावर टीका करीत लोकप्रतिनिधी म्हणून निषेध व्यक्त केला होता. त्याला आमदार मोनिका राजळे यांनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय कीर्तने, माजी उपसभापती विष्णूपंत अकोलकर, वामन कीर्तने, पिराजी कीर्तने, रामकिसन काकडे, नारायण पालवे, सुनील ओव्हळ, भगवान साठे, साकेगावच्या सरपंच अलका सातपुते, आशा गरड, अ‍ॅड चंद्रकांत सातपुते, अ‍ॅड विशाल सातपुते, साहेबराव सातपुते, रंगनाथ देवढे, आर. जे. महाजन, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, मोहन एकशिंगे, संतोष सातपुते, विक्रम डांगे, रामदास सातपुते, साहेबराव दसपुते, रंगनाथ देवढे, जालिंदर सातपुते, डॉ. आनंद सातपुते, राहुल देवढे आदी उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, निवडणुका जवळ आल्यानंतर भवितव्यासाठी आंदोलने केली जातात. मात्र मतदार हुशार झाला असून आपल्या सुख-दुःखासह विकास कामे करणार्‍यांच्या मागे जनता उभी राहते. गेल्या सात-आठ वर्षांमध्ये शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यांत दुजाभाव न करता विकासासाठी समान निधी वाटप केला. 2024 मध्ये सुरुवातीला राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागू शकते. आगामी निवडणुकांमध्ये सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

मतदारांच्या पाठिंब्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सत्ता मिळू शकलो. संचालक मंडळाने चांगले निर्णय घेऊन बाजार समितीच्या नफ्यात चांगली वाढ केली. चाळीस लाख रुपये ठेव म्हणून बँकेत ठेवले आहेत. समितीचा चांगला सर्वांगीन विकास आता होत आहे, असेही राजळे यांनी सांगितले. प्रास्ताविक साहेबराव सातपुते यांनी केले. आर. जे. महाजन यांनी आभार मानले.

चूक दुरुस्त करा : राजळे
पदे देऊनही राजळे कुटुंबाची काय चूक झाली, ते आता कळत नाही. त्यांना (दौंड) सभापती करण्यात विष्णूपंत अकोलकर यांचा वाटा आहे. ती चूक अकोलकर यांनी जाहीररित्या कबूल केली. आता झालेली चूक दुरुस्त करा, असे आमदार राजळें म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT