अहमदनगर

दुर्दैवी ! वडिलांच्या दशक्रियेत मुलाचा मृत्यू !

अमृता चौगुले

आश्वी : पुढारी वृत्तसेवा : वडिलांचा दशक्रिया विधी सुरु असताना 40 वर्षिय मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यात पिंप्री लौकी अजमपूर येथे मन सुन्न करणारी ही दुर्घटना घडली. दरम्यान, 10 दिवसांपुर्वी येथील मनमिळावु व मितभाषी जुन्या पिढीचे पदवीधर लक्ष्मण दराडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांचा गुरुवार (दि. 21) रोजी दशक्रिया विधी पार पडत असताना काकपर्श होण्याअगोदरच त्यांचा मोठा मुलगा दिलीप (वय 40 वर्षे) वडिलाच्या पिंडाला कावळ्यांनी नैवद्य घ्यावा, म्हणून नातेवाईक व ग्रामस्थांसह हात जोडुन उभा राहिला असता तो अचानक खाली कोसळल्याने वातावरण सुन्न झाले.

कुणाला काही कळेना, मात्र परिस्थितीचे गांभिर्य ओळखत भारत गीते, रमेश गीते, मगन गीते, भाऊसाहेब मुंढे , संजय बिडवे , बाजीराव गीते, डॉ. रंगन्नाथ गीते , सूर्यभान गीते, नामदेव आव्हाड , आनंदा दराडी, सतिष सोसे आदींनी त्यांना आश्वी येथे खासगी दवाखान्यात नेले. गंभीर अवस्था बघता पुढील उपचारास प्रवरा हॉस्पीटलमध्ये दाखल केले, मात्र दिलीप दराडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. हृदय विकाराने वडिलानंतर मुलानेही जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दराडे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन चिमकुले मुले असा परिवार आहे. दराडे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. व जि. . माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी दुःख व्यक्त केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT