अहमदनगर

श्रीरामपूर : व्यापार्‍यास लुटणारे दोघे केले गजाआड

अमृता चौगुले

श्रीरामपूर(अहमदनगर) : तालुक्यातील टिळकनगर परिसरात व्यापार्‍यास लुटणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी दोन तासात मुद्देमालासह अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याची चेन , रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कामगिरी केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील गुरुकृपा स्टील अ‍ॅण्ड बिल्डिंग मटेरियल, बेलापूर, दुकानचे मालक बाळकृष्ण गोविंद खोसे (रा. खोसेवस्ती, बेलापूर चौक, कोल्हार रोड) यांनी (दि. 18) रोजी सकाळी 11 वा. त्यांच्या दुकानात लागणारे मटेरियल घेण्यासाठी 20 हजार रुपये खिशात घेतले तसेच त्यांचे जुने ग्राहक प्रशांत डांगे (रा. राहाता) यांच्याकडून उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटारसायकलवर राहाता येथे गेले होते. राहाता येथे डांगे भेटले नाही म्हणून ते पुन्हा एकलहरेमार्गे बेलापुरकडे जाण्यास निघाले.

टिळकनगर येथील रांजणखोल चौकातून थोड्या अंतरावर गेल्यावर दोन इसम त्याच्या मोटारसायकला आडवे होवुन त्यांना थांबवले. त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील चाकू दाखवून त्यांना धमकावून म्हणाला की, शांत बस आणि आम्ही सांगतो तसे चल, असे म्हणून तो व त्याचा सोबतचा दुसरा इसम असे दोघे खेसे यांच्या मोटारसायकलवर मागे बसुन त्यांना मोटारसायकल टिळकनगर कारखान्याकडे घेण्यास सांगितली.

खोसे यांना मोटारसायकल टिळकनगर कारखाना व पुढे एकलहरेकडे जाणार्‍या रोडने रांजणखोल शिवारात साळुंखेवस्ती समोर मोटारसायकल बाजुला थांबायला सांगितली. मोटारसायकल थांबवताच त्यांनी चाकुचा धाक दाखवून खोसे यांच्या खिशातील 20 हजार रुपये, गळ्यातील सोन्याची चेन व एक मोबाईल काढून घेतला. त्यावेळी तिथे आणखी एक इसम मोटारसायकलवर आला व तिघेे मिळून खोसे यांना आणखी पैसे पाहिजे म्हणून मारहाण करु लागले. त्यावेळी खोसे यांनी आराओरडा केल्याने आरोपी मोटारसायकलवर पळुन गेले. याबाबत खोसे यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी गुप्त बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला असता संशयित रईस शेरखान पठाण (वय 28, रा. टिळकनगर, ता. श्रीरामपूर) व रोहित सोपान रामटेके (वय 31, रा. रांजणखोल ता. श्रीरामपूर) व त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी हा गुन्हा केल्याची व सध्या ते टिळकनगर परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या परिसरात सापळा लावून यातील दोन आरोपींना पकडले. पोलिसांना त्यांनी गुन्हाची कबुली दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT