अहमदनगर

Nagar accident news : जबरदस्तीने मेसचे डबे पोचविणे बेतले जीवावर

अमृता चौगुले

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : जेवणाचे डबे द्यायला गेलेल्या दोन तरुणांचा घरी येताना सोमवारी सायंकाळी नगर-दौंड रस्त्यावर शिरजगाव फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. आकाश ज्ञानेश्वर ढगे (26) व सचिन नितीन ठुबे (17, दोघे रा. काष्टी) अशी त्यांची नावे आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (पुनर्वसन) येथील रहिवासी असलेले आकाश व सचिन यांना सांगवी फाटा येथील मेसचालक भूषण खेडकर व अतुल खेडकर यांनी जबरदस्तीने बेलवंडी येथे जेवणाचे डबे पोहोच करण्यासाठी पाठविले होते. दोघेही दुचाकीवरून बेलवंडीला गेले होते. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन पसार झाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT