करंजी : पुढारी वृत्तसेवा : दुधाचा टँकर व ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजी नानासाहेब भवार (रा. निवडुंगे ता.पाथर्डी) व जावेद शेख (रा.विहामांडवा, ता. पैठण) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर, ट्रकमधील ऋषिकेश मोटकर, गणेश गाभूर (रा.विहामांडवा ता.पैठण) हे गंभीर जखमी झाले आहेत.
नगरकडून तिसगावकडे येत असलेला दुधाचा टँकर व पैठणकडून नगरकडे जात असलेल्या ट्रकची सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घाटाच्या पायथ्याशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात टँकर चालक शिवाजी भवार व ट्रकमधील जावेद शेख या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, ट्रकमधील ऋषिकेश मोटकर, गणेश गाभूर गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात टँकर व ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर करंजी येथील वारकरी संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव मुखेकर, छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे, प्रदीप अकोलकर, गणेश पाठक, तसेच पाथर्डी पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात पाठविण्यास मदत केली.
महामार्गावर शेंगदाण्याचा खच
पैठणकडून नगरकडे जात असलेल्या या अपघातग्रस्त ट्रकमध्ये सुमारे साडेआठ शेंगदाण्याचे पोती भरलेली होते. अपघातानंतर यातील काही पोती फुटल्याने महामार्गावर शेंगदाण्याचा मोठा खच पडला होता.
हेही वाचा :