अहमदनगर

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा संकर यांची बदली

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : श्री. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा संकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विधी व न्याय विभाग सचिवांच्या सल्ल्याने अन्य अधिकार्‍यांकडे पदभार सोपवून कार्यमुक्त व्हावे, असे आदेश राज्य शासनाचे अप्पर मुख्य सचिवांनी काढले आहे. पी सिवा संकर हे अद्याप नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. आयएएस केडरचे पी सिवा संकर यांची मे 2023 मध्ये शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. साईबबाबा मंदिरा परिसरात चप्पल बंदी तसेच गावकर्‍यांना दर्शनासाठी ओळखपत्र सक्ती असे कडक नियम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले. अत्यंत कडक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचे कामकाज होते. कडक नियमामुळे शिर्डी गावकरी त्यांच्यात अनेकदा शाब्दीक वादावादी झाली होती.

संबंधित बातम्या :

ओळखपत्र सक्तीच्या निर्णयाला शिर्डी गावकर्‍यांनी विरोध दर्शविला होता. यासदंर्भात गावकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला पोहचले होते. त्यानंतर पी सिवा संकर यांच्या बदलीचे आदेश निघाल्याची चर्चा आहे. शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी पदी अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे संस्थानचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पी सिवा संकर हे आज मंगळवारी रजेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होवू शकला नाही. पी सिवा संकर यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले कठोर निर्णय आणि त्याला शिर्डी ग्रामस्थांनी केलेला विरोध यामुळेच त्यांची आठ महिन्यातच बदलीला सामोरे जावे लागल्याची चर्चा सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT