अहमदनगर

नगर : चांदा दरोड्यातील तिघांना अटक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात राजू विठ्ठल बर्‍हाटे (वय 48) यांच्या घरावर गुरूवारी (दि.10) दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी बर्‍हाटे कुटुंबियांना मारहाण करत दागिने, रोख व मोबाईल, असा एक लाख 90 हजारांचा ऐवज लुटून नेला होता. एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 24 तासांत दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावून तीन आरोपींना अटक केली आहे. किरण जयराम भोसले (वय 32, रा. हिंगणगाव, ता. शेवगाव), राहुल जयराम भोसले (वय 20, रा. एरंडगाव, ता. शेवगाव), भैय्या चेट काळे (वय 20, रा. एरंडगाव, ता. शेवगाव) या तिघांना एलसीबीने अटक केली. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

नेवासा, शेवगाव शिवारातील रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असताना किरण भोसले व त्याच्या साथीदारांनी हा दरोडा टाकल्याची माहिती पोलिस निरीक्षक आहेर यांना मिळाली. आरोपींच्या ठिकाणाचा शोध घेत आरोपींना शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथून अटक केली. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, हवालदार सुनील चव्हाण, बबन मखरे, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, फुरकान शेख, शिपाई रवींद्र घुंगासे,यांच्या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करून 24 तासांत आरोपी गजाआड केले.

चोरीचा ऐवज घेऊन दोघे पसार
दरोडा टाकणार्‍यांपैकी सुदास सुदमल काळे (रा.गेवराई, ता. नेवासा), जितीन बाबुलाल ऊर्फ नामदेव चव्हाण (रा.पोखरा, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) हे दोघे फसार झाले आहेत. या दोघांकडे दरोड्यातील चोरीचा ऐवज असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. किरण जयराम भोसले व भाऊ राहुल जयराम भोसले हे दोघे सख्खे भाऊ पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. साथीदारांच्या मदतीने दोघांनी चोरीचे गुन्हे केले आहेत. राहुरी पोलिस ठाण्यात दोघांवर चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT